
विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ ने अखेर १४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात धडाक्यात एंट्री घेतली. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपटाच्या तिकीट बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे ओपनिंग डे कलेक्शनबाबत मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्याच अपेक्षांवर चित्रपट खरा उतरला आहे.