
मॅडॉक फिल्म्सचे निर्माते दिनेश विजन यांच्या ‘छावा’ या चित्रपटाने 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर 807.88 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असला, तरी या यशावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रसिद्ध ट्रेड विश्लेषक कोमल नाहटा यांनी विजन यांच्यावर ब्लॉक बुकिंगचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे चित्रपट उद्योगात खळबळ उडाली असून, ‘छावा’च्या यशाची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.