
विकी कौशलचा या वर्षातील सर्वोत्कृष्ट पीरियड ड्रामा चित्रपट 'छावा' १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, आता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. वाचा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल.