

Daryabhavani Release Date
ESakal
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील सातवे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प 'दर्याभवानी' नव्या वर्षात १५ जानेवारी २०२७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या शुभमुहूर्त आणि भव्य पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी कलाकार तसेच दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांची विशेष उपस्थिती लाभली. आकर्षक पोस्टरने चित्रपटा विषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.