
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित या चित्रपटाने इतिहासाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सर्वांनाच भावनिक केलं आहे. अनेक नेते, कलाकार आणि चाहत्यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.