
पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियन च्या असाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत. ‘आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो’ म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. ‘बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला’ म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे पार्टी टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.