

chikizing
esakal
बालपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं… एखादा रंगीत दगड म्हणजे खजिना, एखादी काठी म्हणजे जादूची कांडी आणि एका बंद दरवाजापलीकडचं जग म्हणजे एक मोठं स्वप्न! याच निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या ‘चिकिझिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आलं. त्यासोबतच हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत, १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एका हिलस्टेशनच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘चिकिझिंग’ची कथा आहे, गरिबीच्या परिस्थितीत वाढणाऱ्या एका चुणचुणीत, स्वप्नाळू आणि खोडकर मुलाची.