
Pratik Utekar On Affair Rumours With Dhanashree: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्यां चर्चांनी जोर धरला आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे आणि त्यांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांचे फोटो डिलिट केले आहे. त्यामुळे हे दोघंही वेगळे होत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून चहल-धनश्री यांच्या घटस्फोटाबाबत माध्यमांमध्ये अनेक बातम्या आल्या आहेत. धनश्रीचे नाव कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत जोडले गेले आणि दोघांचा एक फोटोही समोर आला होता. त्यानंतर ट्रोलर्सनी धनश्रीला खूप ट्रोल केले होते. आता प्रतीक उतेकरने अफेअरच्या अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.