Marathi Cinema Loss : फुलवंती, सरदार हंबीरराव मोहिते, रामायण चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर तन्मय वनमाळी काळाच्या पडद्याआड

Tanmay wanmali : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेने वेगळी ओळख निर्माण करणारे तरुण सिनेमॅटोग्राफर तन्मय यांच्या निधनाने चित्रपटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांसाठीही काम केले होते.
Marathi and Hindi filmsCinematographer

Marathi and Hindi filmsCinematographer

sakal

Updated on

उत्तम मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) यांची मोठी भूमिका असते. आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर तन्मय वनमाळीने या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. नामवंत सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्यासोबत काम करत त्याने अनेक मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटांच्या छायाचित्रणात महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र, अवघ्या ३१ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com