

COLORS MARATHI NEW SERIAL
ESAKAL
छोट्या पडद्यावर नुकतंच 'बिग बॉस मराठी ६' चं दार उघडलंय. कलर्स मराठीवरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. काल ११ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचा प्रीमिअर पार पडला. अशातच या प्रिमिअरदरम्यानच कलर्स मराठीने आणखी एक डाव टाकलाय. 'बिग बॉस मराठी ६'चा प्रीमिअर सुरू असतानाच कलर्स वाहिनीने त्यांच्या आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. वाहिनीने या नव्या मालिकेचा प्रोमोदेखील शेअर केलाय. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.