बेपत्ता मूल अन् मनोरुग्णालयातून पळालेला माणूस; जितेंद्र कुमार-प्रिया बापटचा ‘डाळिंब’ थरारक कथेसह येणार भेटीला

Daalimb Trailer Jitendra Kumar Priya Bapat Psychological Thriller: हिंदी ZEE5 ने आपल्या आगामी ओरिजिनल फीचर फिल्म डाळिंब चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात जितेंद्र कुमार एका कधीही न पाहिलेल्या भूमिकेत तर प्रिया बापट पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
dalimb movie trailer

dalimb movie trailer

esakal

Updated on: 

रहस्य, अनपेक्षित घटना आणि माणसांच्या आयुष्यात दडलेल्या गोष्टी यांची सांगड घालणाऱ्या हिंदी ZEE5 ने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘डाळिंब’ असं या सायकोलॉजिकल थ्रिलरचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना रहस्याचा वेध घेणारा वेगळाच अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, जितेंद्र कुमार एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून प्रिया बापट पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी केवळ हिंदी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...