

Osho Ashram: मराठी सिनेइंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलेलं. त्यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरायचा. त्यांनी द्विअर्थी संवाद लिहून सगळ्यांची बोलती बंद केली होती. जसे त्यांचे चाहते होते तशीच त्यांच्यावर टीकाही व्हायची. त्यांच्या एका सिनेमामुळे त्यांना थेट ओशोंच्या आश्रमातून बोलावणं आलं होतं. हा चित्रपट होता ‘ह्योच नवरा पाहिजे’. यात दादांनी चमत्कार करणाऱ्या बुवावर विनोद केला होता.