
दादासाहेब फाळके हे व्यक्तिमत्व भन्नाटच होते. शतकभरापूर्वी कसलेही तंत्रज्ञान हाती नसताना निव्वळ पॅशन म्हणून हा माणूस सिनेमा बनवू लागला. भारतातला पहिला सिनेमा दादासाहेब फाळकेंनी बनवला. १९१२ मध्ये त्यांनी ‘अंकुराची वाढ’ ही आजच्या भाषेत सांगायचं तर ‘शॉर्ट फिल्म’ केली. त्याच्या पुढच्याच वर्षी ‘राजा हरिश्चंद्र’आला आणि भारतीय सिनेमाने जन्म घेतला.