

ACTORS FEES FOR DAHIHANDI CELEBRATION
ESAKAL
FEES OF ACTORS FOR DAHI HANDI CELEBRATION: कृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करायचा म्हणजे दहीहंडी साजरी करायची. थरावर थर रचून गोविंदा एकमेकांच्या साथीने उंचावर लटकवलेली हंडी फोडतात. यापूर्वी साधेपणाने गल्लोगल्लीत होणाऱ्या या उत्सवाला आता स्पर्धेचं स्वरूप आलं आहे. तुझा कार्यक्रम मोठा की माझा कार्यक्रम मोठा अशी स्पर्धा ठाणे मुंबईत सर्रास पाहायला मिळते. ठाणे, मुंबईतील अनेक दहीहंडी हे राजकीय नेते भरवताना दिसतात. कोट्यवधींची बक्षिसेदेखील दिली जातात. मात्र यासोबत अशा कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण असतं ते म्हणजे सिनेकलाकारांची हजेरी. मात्र या कार्यक्रमासाठी कलाकार किती पैसे घेतात तुम्हाला ठाऊक आहे का?