Dashami Movie Review: रहस्य, टर्न-ट्विस्ट आणि स्त्रीशक्तीचा हुंकार! मकरंद अनासपुरे यांच्या ‘दशमी’ चित्रपटात काय जमलं, काय खटकलं?

Dashami Marathi Movie Review | Gauri Ingawale And Makarand Anaspure Film Story: मकरंद अनासपुरे गंभीर भूमिकेत, गौरी इंगवलेचा दमदार अभिनय; कसा आहे अन्यायाविरुद्ध लढणारा ‘दशमी’ चित्रपट?
dashami movie review

dashami movie review

esakal

Updated on: 

अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध जिद्दीने उभी राहणाऱ्या एका तरुणीचा संघर्ष म्हणजे ‘दशमी’ हा चित्रपट. योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटात एका मुलीच्या स्वप्नांचा, तिच्यावर ओढवलेल्या संकटांचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. कौटुंबिक भावविश्वाला रहस्याची जोड देत ही कथा पुढे सरकते. प्रभाकर देसाई (मकरंद अनासपुरे) हा एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करणारा मध्यमवर्गीय माणूस. मिळणाऱ्या मर्यादित पगारात कुटुंबाचा गाडा चालवताना त्याची धडपड सुरू असते, मात्र त्याच्या मुलीला लक्ष्मीला (गौरी इंगवले) डॉक्टर बनवण्याचे त्याचे स्वप्न आहे. लक्ष्मीलाही शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. तिचं वासू (राज कुंदन) या तरुणावर प्रेम असते, पण आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या काही घटना घडतात आणि लक्ष्मीच्या आयुष्यात मोठे संकट उभे राहते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com