
छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात आवडीने बघितल्या जातात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा म्हणून मालिका बघितली जाते. स्त्रियांसोबतच पुरुष मंडीळीही मालिका मोठ्या उत्सुकतेने पाहताना दिसतात. मात्र काही स्त्रियांसाठी मालिका या खूपच जवळच्या असतात. त्या दररोज न चुकता मालिका बघतात. नायिकांवर प्रेम करतात आणि खलनायिकांना वाईट म्हणतात. मात्र या मालिकांचा केक जर कुणी तुमच्या वाढदिवसाला आणला तर? सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात लेकीने तिच्या आईच्या वाढदिवसाला आईच्या आवडत्या मालिकांचा केक आणला आहे.