
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या मालिकेच्या चाहत्यांची संख्या प्रचंड होती. तब्बल १२ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. मात्र हळूहळू या मालिकेचा टीआरपी कमी झाला. त्याचं कारण म्हणजे मालिकेतील कलाकार. मालिकेतील अनेक कलाकार काळानुसार मालिका सोडून गेले. कुणी दुसऱ्या मालिकेसाठी या मालिकेचा निरोप घेतला तर कुणी लग्नासाठी मालिका सोडली. त्यातील एक कलाकार म्हणजे दिशा वकानी. मालिकेतील दयाबेन गेली आणि जणू मालिकेला दृष्ट लागली. आता दिशाचा नवा फोटो समोर आलाय जो पाहून चाहते थक्क झालेत.