
दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ या दोघीही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री आहेत. या दोघीही प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत.त्यांनी कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. मात्र त्यांच्यात एक सामान धागा आहे तो म्हणजे अभिनेता रणबीर कपूर. त्या दोघींनी अभिनेता रणबीर कपूरला डेट केलंय. मात्र ब्रेकअपनंतर दीपिकाने रणवीर सिंह याच्याही लग्न केलं तर कतरिनाने विकी कौशलशी. अलिकडेच दीपिका आणि कतरिना यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, जे पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्या दोघीही बनारसच्या घाटावर फिरताना दिसल्या आहेत.