

deepika padukone
esakal
भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोणची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत 'पद्मावत', 'जवान' आणि 'कल्की २८९८ एडी' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे दीपिकाने बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मोठ्या कलाकारांसोबत काम करतानाही ती आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप पाडते. आता २०२६ मध्ये येणारे तिचे दोन मोठे चित्रपट तिला पॅन-इंडिया स्टार म्हणून पुन्हा एकदा सिद्ध करणार आहेत. त्यामुळे २०२६ मध्येही दीपिका बॉक्स ऑफिस गाजवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.