
'बिग बॉस मराठी ५' ने अनेक रीलस्टार्सना ओळख मिळवून दिली. त्यात एक होता कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार. बिग बॉस संपल्यानंतरही धनंजय सोशल मीडियावर चर्चेत होता. आता पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय बनला आहे. त्याने केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे पराभूत ठरल्यानंतर त्याने पंचांना मारलं होतं. त्यावर आता धनंजयने प्रश्न उपस्थित केलाय.