dhananjay powar esakal
Premier
काय रे तू, मटण खातो आणि वारीला येतो? म्हणणाऱ्यांना धनंजय पोवारचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुमच्या थाळीत...'
DHANANJAY POWAR SLAMS TROLLERS FOR W=QUESTIONING HIS FAITH ON VITHHAL: धनंजय नॉनव्हेज खातो आणि वारीला जातो यावरून काहींनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने ट्रोलर्सना उत्तर दिलंय.
'बिग बॉस मराठी ५'मध्ये काही इन्फ्लुएन्सरदेखील सहभागी झाले होते. त्यातील एक म्हणजे धनंजय पोवार. आपल्या रिल्समधून धनंजय याने लोकप्रियता मिळवली. मात्र तो घराघरात पोहोचला तो 'बिग बॉस मराठी' मुळे. यातील त्याचा खेळ सगळ्यांच्या पसंतीस उतरला होता. त्याच्या स्वभावाने तो चाहत्यांचा आवडता बनलेला. धनंजय सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो कायम आपल्या पत्नी आणि आईसोबतचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करतो. मात्र आता त्याला वारीत सहभागी होण्यावरून काहींनी ट्रोल केलंय. त्यावर धनंजयनेदेखील सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केलीये.