
लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल व नृत्यांगना असलेली धनश्री वर्मा यांनी अखेर एकमेकांपासून घटस्फोट घेतलाय. ते दोघेही आता विभक्त झालेत. त्यांनी २०२० मध्ये थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यांनी २० मार्च २०२५ रोजी घटस्फोट घेतला. मुंबईतील फॅमिली कोर्टात त्यांच्या केसची सुनावणी झाली. त्यानंतर सोशल मीडियावर निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर पहिल्यांदाच धनश्री एकटी माध्यमांसमोर आली. तेव्हा तिला घटस्फोटावर पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली.