
आपल्या अभिनयासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. १९७० मध्ये त्या दोघांची भेट झाली. चार मुलं असूनही धर्मेंद्र यांनी हेमा यांच्याशी लग्न केलं. 'शोले' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. मात्र तेव्हा त्यांचं आधीच एक लग्न झालं होतं. तरीही त्यांनी हेमा यांच्याशी लग्न केलं. पुढे एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी एका मुलाखतीत यासगळ्यावर भाष्य केलं होतं.