

dhurandhar 2 actress SALARY
ESAKAL
एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की त्या चित्रपटातल्या कलाकारांचीही चांदी होते. 'धुरंधर' आणि धुरंदर २' ने प्रेक्षकांना भुरळ पाडलीये. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालल्याने त्यातील कलाकारही प्रेक्षकांमध्ये चर्चेत आले. रहमान डकैतची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना असो किंवा जमील जमालीची भूमिका साकारणारे राकेश बेदी असोत. अशातच आता सोशल मीडियावर आणखी एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगलीय. एका सपोर्टींग अभिनेत्रीचा अवघ्या ५ सेकंदाचा रोल सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. सोबतच त्या अभिनेत्रीने घेतलेलं मानधन ऐकून चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात.