

Dhurandhar 2 meme
Sakal
funny memes after Dhurandhar 2 release: धुरंधर 2 रिलीज होताच बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या अॅक्शन-थ्रिलरमध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकतोय, आणि त्याची दमदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. चित्रपटात भरपूर ट्विस्ट, थरार आणि अॅक्शनसोबतच काही ठिकाणी हिंसेचेही जोरदार दर्शन घडते. रिलीजच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करत या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग घेतली आहे.
मात्र, फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर सोशल मिडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. चित्रपटातील डायलॉग्स, सीन आणि कॅरेक्टर्सवर आधारित भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षक त्याचा भरभरून आनंद घेत आहेत. काही मीम्स तर इतके मजेशीर आहेत की पाहून हसू आवरणेच कठीण होत आहे!