

sachin tendulkar
ESAKAL
सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' नावाचं वादळ घोंगावतंय. प्रदर्शनाच्या तीन आठवड्यातच या चित्रपटाने तब्बल ७०० कोटींची कमाई केलीये. दिग्दर्शक आदित्य धर याच्या या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबतच या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना आणि संजय दत्तदेखील मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या चित्रपटातील अभिनयाची देखील प्रचंड प्रशंसा होतेय. या सगळ्यासोबतच या चित्रपटातील अभिनेत्री सारा अर्जुन देखील चांगलीच चर्चेत आहे. मात्र आता सारा एका वेगळ्याच करणामुळे चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी सारा अर्जुनचं आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यामधील कनेक्शन शोधलं आहे.