
'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार ही लवकरच झी मराठीवर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव जगद्धात्री होतं. मात्र नंतर ते बदलण्यात आलं. आता या मालिकेची कथा काय असणार आहे याबद्दल काही माहिती समोर आलीये. ही कथा आहे मुंबईच्या तारिणी बेलसरेची. ही कहाणी प्रेक्षकांना एका वेगळ्याच रहस्याच्या प्रवासात घेऊन जाणारी आहे. तारिणीची आई पोलीस खात्यात एक प्रामाणिक हेड कॉन्स्टेबल होती, मात्र तिच्यावर लाचखोरीचा खोटा आरोप ठेवण्यात आला आणि याच भीतीपोटी तिने आत्महत्या केल्याचं दाखवलं गेलं. वडिलांनी मुलीच्या भवितव्यासाठी दुसरं लग्न केलं खरं, पण तारिणीच्या सावत्र आईने घरातून तिच्या आईच्या आठवणी पूर्णपणे पुसून टाकल्या.