

DIGPAL LANJEKAR
ESAKAL
येत्या ३० जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'पुन्हा साडे माडे तीन' आणि 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' हे दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहेत. त्याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसणार आहे. मात्र लांजेकरांचा 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' हा चित्रपट आधी १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र अचानक या चित्रपटाची तारीख बदलून आधीची घेण्यात आली. यावर 'पुन्हा साडे माडे तीन'चे निर्माते आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला होता. दिग्पालने आगाऊपणा केला आहे, चर्चा करूनही त्याने तारीख बदलली नाही, फोन उचलत नाही असे आरोप त्यांनी केले होते. आता त्यावर दिग्पाल यांनी उत्तर दिलंय.