

JETHALAL AKA DILIP JOSHI WIFE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना वेड लावलं. गेली १२ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या मालिकेतील पात्र बदलली, तरी या मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम मुळीच कमी झालं नाही. कार्यक्रमात दयाबेन कधी करत येतेय याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र तुम्ही जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाबेनला पाहिलंय का? नुकतीच अभिनेते दिलीप जोशी यांनी त्यांच्या पत्नीसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्या पत्नीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.