
Dashavatar Movie Review
Entertainment News : भारतात अनेक लोककला प्रकार आहेत आणि त्या त्या राज्यांमध्ये त्या प्रसिद्ध आहेत. या लोककलांनी समाजमन समृद्ध केलेच, शिवाय चांगले संस्कार घडविले आणि समाजप्रबोधनही केले. अशीच एक लोककला म्हणजे दशावतार. कोकणातील लोकजीवनात ‘दशावतार’ ही कला केवळ नाटक म्हणून नाही तर श्रद्धा, परंपरा आणि आनंदाचा उत्सव म्हणून रुजलेली आहे.