
Director Anubhav Sinha Slammed Audience
Bollywood News : दिग्दर्शक अनुभव सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘रावण’, ‘आर्टिकल १५’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ सारख्या सामाजिक आशयाच्या चित्रपटांमुळे ओळख मिळवणाऱ्या सिन्हा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलांबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, आजचा काळ असा आहे की लोक चित्रपटाचा आनंद घेण्यापेक्षा त्याच्या कमाई आणि बजेटवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत आणि हीच संस्कृती उद्योगासाठी घातक ठरू शकते.