
अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. तो अनेकदा वादांमध्येही अडकलाय. त्याचं नाव अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही जोडलं गेलं. त्यांनी ‘अंदाज’, ‘ऐतराज’ आणि ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटात एकत्र काम केलंय. ते यानंतर चौथ्या चित्रपटातही काम करणार होते. मात्र असं काहीतरी घडलं ज्यामुळे अक्षयने या चित्रपटासाठी नकार दिला. लोकप्रिय दिग्दर्शकाने तो किस्सा सांगितला आहे.