
Marathi Entertainment News : समित कक्कडने आजवर अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. समितला एक हुशार आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. त्याने आजवर आयना का बायना, हाफ तिकीट, ३६ गुण आदि चित्रपटांबरोबरच, इंदोरी इश्क आणि धारावी बँक, सारख्या वेब सिरीज बनवल्या आहेत. त्याने आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. वास्तववादी आणि नाविन्यपूर्ण कथांची मांडणी करण्यात त्याचा हातखंडा आहे.