
छोट्या पडद्यावर लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच हा कार्यक्रम झी मराठीवर सुरू होतोय. मात्र यावेळेस कार्यक्रमाचं रुपरंग वेगळा असणार आहे. यावेळेस कार्यक्रमाचा आधीचा दिग्दर्शक, लेखक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे कार्यक्रमाचा भाग नाहीये. त्याच्यासोबतच आणखी एक व्यक्ती या कार्यक्रमाचा भाग नाहीये. तो व्यक्ती म्हणजे हास्याचा विनोदवीर भाऊ कदम. आता भाऊ कदम या सीझनमध्ये का नाहीये याचं कारण समोर आलंय.