

kusum tai from tharla tar mag
ESAKAL
मोठ्या पडद्यावर काम करणं, मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. या दिवसासाठी प्रत्येक छोटा कलाकार हा दिवसरात्र धडपडत असतो. मात्र आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर काही कलाकार मोठी मजल मारताना दिसतात. अशीच एक कलाकार चक्क रणबीर कपूरसोबत झळकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'ठरलं तर मग' मधील सुमन ताई म्हणजेच दिशा दानडे. दिशाने रणबीरसोबत एका जाहिरातीत काम केलंय. आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.