
शौर्य, निष्ठा आणि कर्तव्याप्रती अविरत समर्पिततेची गाथा असणारी एक सीरिज डिस्नी+ हॉटस्टार प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्याचं नाव आहे 'द सिक्रेट ऑफ शिलेदार'. ही सिरीज स्वराज्यातील दिग्गज संरक्षक व विश्वसनीय कारभारी 'शिलेदार'ची कथा दाखवते. 'मुंजा' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन आणि नितीन वैद्य निर्मित या सिरीजमध्ये राजीव खंडेलवालसह सई ताम्हणकर, दिलीप प्रभावळकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज ३१ जानेवारी २०२५ पासून फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर पाहता येईल. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिन्याचं रहस्य दाखवण्यात आलं आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झालाय.