

divine surrender
esakal
'डिव्हाइन सरेंडर - द बुद्धिस्ट अँथम ऑफ पीस, अवेकनिंग ॲन्ड कंपॅशन' या गीताचे प्रकाशन मुंबईतील चर्चगेट येथील डाऊनटाऊन २० हॉलमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानातील शांतता, आत्मबोध (Awakening) आणि करुणा (Compassion) या मूल्यांचा प्रभावी संदेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेले अभिनेते गगन मलिक यांनी यात प्रतीकात्मक भूमिका साकारली, तर सुप्रसिद्ध बौद्ध संगीतकार पावा यांनी या गीताला संगीतबद्ध व स्वरबद्ध केले. दिग्दर्शक निराज प्रभाकर यांच्या कलात्मकतेची जोड आणि युगंधर क्रिएशन्सचे अनिकेत बडोले यांची निर्मिती असलेल्या या गीताने ध्यान, संगीत आणि जागरूकतेचा एक अद्वितीय संगम साधला आहे.