

rajinikanth lovestory
esakal
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आयुष्याची कथा सगळ्यांनाच ठाऊक आहे. ते आधी कंडक्टर होते आणि या शिवाजीरावचा राजनीकांत कसा झाला हा प्रवास त्यांच्या चाहत्यांना ठाऊक आहे. मात्र या प्रवासात आणखी एक व्यक्ती होती जिचा कुठेही उल्लेख नाही. तिच्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. ते होतं रजनीकांत यांचं पहिलं प्रेम. निर्मला. अभिनेते- निर्माते श्रीनिवासन आणि रजनीकांत एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यांना एकदा अभिनेत्याने त्यांच्या या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. रजनी यांचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिने त्यांना खूप पाठिंबा दिला. मात्र एक दिवस ती अचानक गायब झाली.