

Kishore Kumar's emotional last song "Guru Guru Aa Jao Guru" recorded a day before his death
esakal
Kishor Kumar Best Songs News : भारतीय संगीत विश्वातील अष्टपैलू कलाकार आणि सुरांचा राजा किशोर कुमार (Kishore Da) यांच्याबद्दल अनेक रंजक किस्से प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या मृत्यूशी संबंधित एक घटना आजही चाहत्यांना भावूक करते. किशोर कुमार यांनी १३ ऑक्टोबर १९८७ रोजी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेच्या अवघ्या २४ तास आधी म्हणजेच १२ ऑक्टोबरला त्यांनी त्यांचे शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते. हे गाणे केवळ एक रेकॉर्डिंग नव्हते तर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा सुरेल प्रवास ठरला. एका वृत्तानुसार ३९ वर्षांनंतरही हे गाणे आजही यूट्यूबवर तुफान लोकप्रिय आहे.