
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक 'कल्ट क्लासिक' म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती, जो त्या काळातील एक विक्रम होता. आजही हा चित्रपट टीव्हीवर किंवा इतर माध्यमांवर आवडीने पाहिला जातो आणि प्रेक्षकांना आजही तो तितकाच आवडतो. मात्र या चित्रपटाचं शूटिंग नेमकं कुठे आहे तुम्हाला ठाऊक आहे का?