
'भेटली तू पुन्हा' या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज २५ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ती पती सोबत फिरायला गेलीये. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. मात्र त्यांची पहिली भेट कुठे झाली होती हे तुम्हाला ठाऊक आहे का?