
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता ५९ वर्षांचा आहे आणि त्याचे चाहते अजूनही त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. आता सलमानने स्वतःचं लग्न करणार नाही असं सांगितलंय. सलमानने बॉलिवूड गाजवलं असलं तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो एकटा आहे. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं, परंतु त्याचं एकही नातं टिकलं नाही. आज सलमानच्या जवळजवळ सर्व एक्स गर्लफ्रेंड विवाहित आहेत आणि तो अजूनही अविवाहित आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का सलमानची पहिली गर्ल फ्रेंड कोण होती आणि ती आता कुठे आहे आणि ती काय करते?