
जुनं ते सोनं म्हणतात. तसेच जुने कलाकार आणि जुनी गाणी आजही कित्येकांची आवडती आहेत. हे कलाकार आणि गाणी कधीही प्रेक्षकांच्या विस्मरणात गेली नाही. ६०- ७० च्या दशकातील कित्येक गाणी तर अजरामर ठरली. आजही त्यातील कित्येक गाण्यांवर चाहते ठेका धरतात. त्यातलंच एक गाजलेलं गाणं म्हणजे 'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...'. हे गाणं आजही तितकंच एव्हरग्रीन आहे. मात्र यातील कलाकार तुम्हाला आठवतात का? या गाण्यात अभिनेत्री जीवनकला कांबळे केळकर यांनी अभिनय केला होता. आता त्या कशा दिसतात माहितीये?