

KAREENA KAPOOR
ESAKAL
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. हा महिना सगळ्यात पवित्र मानला जातो. सध्या सगळीकडे टीव्ही असो किंवा बॉलिवूड, सगळेच कलाकार आपले रोजाचे आणि इफ्तारचे फोटो शेअर करताना दिसतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मुस्लिम धर्मात लग्न केलंय. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलंय. त्यांना दोन मुलंदेखील आहेत.तिने तिच्या आडनावात खान हे नावही जोडलंय. त्यामुळेच लग्नानंतर करिनाने तिचा धर्म बदललाय का, ती रमजानमध्ये रोजा ठेवते का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. एका मुलाखतीत तिने याचं उत्तर दिलं होतं.