

MISTAKE ON AJAY DEVGN DRISHYAM 3 MOVIE
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा नवा चित्रपट 'दृश्यम ३'. हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसात २५० कोटींचा गल्ला जमावलाय. प्रेक्षक कधीपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. चित्रपटात विजय साळगावकर जिंकणार हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे मात्र तो कसा जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. तेच या चित्रपटात दाखवण्यात आलंय. मात्र चित्रपटाच्या शेवटी पोलिसांकडून खूप मोठी गोष्ट चूक होते जी कुणाच्याही लक्षात आलेली नाही. मात्र कॉमन सेन्स लावणाऱ्या नेटकऱ्यांनी ही चूक पकडलीये.