

kamlesh sawant as gaytonde
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याचा 'दृश्यम ३' सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अजयच्या आधीच्या सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत. पहिल्या ३ दिवसातच या चित्रपटाने २५० कोटींहून जास्तीचा गल्ला जमवलाय. चित्रटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. विशेषतः जयदीप अहलावत आणि अजय देवगन. या चित्रपटात अनेक मराठी चेहरेदेखील दिसतायत. त्यातील एक म्हणजे इन्स्पेक्टर गायतोंडे. अभिनेते कमलेश सावंत यांनी या चित्रपटात गायतोंडेंची भूमिका साकारलीये. मात्र आता एका अभिनेत्याने त्यांची भूमिका चांगली झाली नसल्याचं म्हटलंय. ज्यावर नेटकऱ्यांनीच त्यांना उत्तर दिलंय.