

drushyam banglow
esakal
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाजणाऱ्या 'दृश्यम' फ्रॅन्चायजीचा दुसरा भाग २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटाने थिएटरमधे धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाची कथा आणि यातील ट्विस्ट प्रेक्षकांना आवडलेत. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केलीये. चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिलंच सोबत लक्षात राहिलं ते विजय साळगावकर यांचं घर. 'दृश्यम' चित्रपटाच्या प्रत्येक भागावेळी या घराची चर्चा होते. याच घरात विजय सगळा प्लॅन करतो. सगळे पुरावे नष्ट करतो आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करतो. तुम्हाला माहितीये का कुठे आहे हा बंगला?