

DWIDHA MOVIE REVIEW
ESAKAL
भारतीय कुटुंबव्यवस्थेत नातेसंबंधांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी काही घट्ट नाती असतात, जी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाला आधार देतात. मग ते आई-वडील आणि मुलांमधील असो, भाऊ-बहिणीचे प्रेम असो किंवा आई-मुलीचे नाते असो...प्रत्येक नात्याची एक वेगळी भावनिक वीण असते. आता अशाच एका वडील आणि मुलीच्या मनाला भिडणाऱ्या हळव्या नात्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट ‘द्विधा’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलेश नाईक यांनी केले आहे. ‘द्विधा’ म्हणजे मनाची अशी अवस्था जिथे दोन परस्परविरोधी विचारांमध्ये किंवा पर्यायांमध्ये माणूस अडकतो. जेव्हा बुद्धी एक सांगते आणि मन भलतेच, अशा वेळी मानसिक ओढाताण प्रचंड होते.