काळाचा थरकाप उडवणारा दिवस! माळीण दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' चित्रपट 'या' दिवशी रिलीज होणार!

EK HOTA MALIN: ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून लिहिली कथा; 'एक होतं माळीण' चित्रपटामध्ये 'हे' कलाकार मुख्य भूमिकेत.
ek hota malin   .jpg

ek hota malin .jpg

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात 30 जुलै २०१४ रोजी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १५० पेक्षा अधिक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता तर शेकडोजण जखमी झाले होते. याच ​दुर्घटनेवर आधारित काळजाचा थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार आता "एक होतं माळीण" या चित्रपटातून येत्या २४ जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा भव्य सेट आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com