

emraan hashmi
esakal
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी याने त्याच्या कारकिर्दीत रोमँटिक हिरोपासून खलनायकाची भूमिका तितक्याच ताकदीने साकारली आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. मोठ्या पडद्यावर त्याने अनेक भूमिका उत्तमरीत्या साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र बापाची भूमिका साकारताना त्याला खूप मोठा धक्का बसला होता. २०१४ मध्ये त्याच्या मुलाला कर्करोगाचं निदान झालं आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इमरानने याबद्दल सांगितलं आहे.